आजच्या भावी पिढीने जीवनात उंच शिखर गाठण्यासाठी पुस्तक व ग्रंथाची कास धरावी या संकल्पनेतून मुख्याध्यापक विलास पाटील यांनी उभारली ग्रंथगुढी...
२ एप्रिल २०२२ हिंदू नववर्ष- शालिवाहन शके१९४४ शुभकृत संवत्सरारंभ ..... चैत्री नवरात्रारंभ ... अर्थात गुढी पाडवा.. मराठी नूतन वर्षारंभ. चैत्रपाडवा -प्रत्येक दारात चैत्राची रांगोळी सजली. आनंदाने निसर्गाच्या गुढया ऊभारत नवचैतन्याची बिजं पेरणाऱ्या ... विलयाला पायाखाली ठेवून चैत्रपालवीद्वारे ओसंडून वाहतांना जन्माइतका मृत्यूही सहज असतो याचा लोभसवाणं आनंददायी प्रत्यय देणारा महिना म्हणजे चैत्र ..... खऱ्याखुऱ्या आनंदाचे प्रतीक म्हणून ज्याच्या कडे मोठेपणाचा मान येतो ... तो हा चैत्र महिना ... त्याचा चैत्र पाडवा आनंदाच्या गुढया उभारत सर्वत्र साजरा होतो ... हाच चैत्रपाडवा जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडीचे मुख्याध्यापक व म.सा.प. पुणे शाखा चोपडाचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी आजच्या पिढीचे भावी प्रतिनिधी असलेल्या नातवंडासमोर पुस्तकांची / ग्रंथाची अभिनव गुढी उभारून साजरा केला. कारण मानवी मन व बुद्धी सुपिक करण्याचे साधन ... आयुष्यभराची शिदोरी म्हणजे ग्रंथ होय. तेव्हा आजच्या भावी पिढीने जीवनातील उंच ध्येय शिखरे पार करायची असतील तर त्यांनी पुस्तक ग्रंथ वाचनाची कास धरावी ,या ज्ञानगुढीचे जतन करावे अशा भावनेतून कल्पकतेने त्यांच्यासमोर संत साहित्य -अध्यात्मिक साहित्य तसेच विविध प्रकारच्या ज्ञानग्रंथाची अभिनव गुढी उभारत गुढीपाडवा साजरा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा