दोन वर्षाच्या खंडा नंतर धूलिवंदनला वर्डी येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचा संजीवन समाधी सोहळा व भंडारा होणार ... - The Chopda News

 The Chopda News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

test banner

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

मार्च १६, २०२२

दोन वर्षाच्या खंडा नंतर धूलिवंदनला वर्डी येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचा संजीवन समाधी सोहळा व भंडारा होणार ...

चोपडा - वर्डी (प्रतिनिधी) :--
     दोन वर्षाच्या खंडा नंतर धूलिवंदनला वर्डी येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचा संजीवन समाधी सोहळा व भंडारा होणार ...
    सालाबादप्रमाणे धूलिवंदनेच्या दिवशी फाल्गुन वद्य पाडव्याला म्हणजेच दि.२०/३/१९३५ ला बाबांनी जिवंत समाधी घेतली आहे त्या निमीत्त गावात हा चैतन्य महोत्सव पार पडत असतो.बाबांचे शिष्य गुरु रेवानंद स्वामी महाराज यांनी ह्या उत्सवाची सुरुवात केली होती. तो समाज एकरुप करण्याचा विचार घेउन आजही ही परंपरा दरबाराचे मठाधिपती श्री दिनानाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य नेमाने सुरु आहे.
      दोन वर्षापासून कोरोणाच्या  महामारी मुळे शासनाच्या आदेशामुळे भंडारा संपन्न झालेला नव्हता आजपर्यंत एवढ्या वर्षापासून चालत असलेल्या बाबांचा भंडारा हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे व संपन्न होत आहे परंतु कोरोणामुळे लोकांवर  प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन वर्षापासून भंडारा झालेला नव्हता तरी यावर्षी बाबांचा भंडारा संपन्न होणार त्यामुळे सर्व गावात आनंदाचे व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, बाबांचा भंडारा म्हणजे जणू काही घरोघरी दिवाळीसारखे वातावरण निर्माण झालेले असते प्रत्येक घरातील व्यक्ती ही आवर्जून भंडारा साठी आलेलीच असते.
    * //  बट्टी , वरण व वांग्याची भाजीचा // *                         * //  महाभंडारा प्रसाद // *
   भाजलेली बट्टी शेकण्यासाठी गोऱ्या आणण्यासाठी गावातील तरुण मंडळी चार दिवसापासून जंगलात जाऊन गोवऱ्या आणण्याचे काम करीत असतात. गावातील सर्व मंडळी आपापल्या परीने भंडारा साठी मदत करीत असते जवळपास 150 क्विंटल गहू वेगवेगळ्या  गिरण यांवर  पाठवून  दोन दिवस आधीच गहू दळण्याचे काम चालू होत असते. कार्यक्रमासाठी गावातील सर्व समाजाचे बांधव गावातील आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतात ,हे या भंडार्‍याच्या पुण्यतिथीनिमित्त आगळावेगळा वैशिष्ट्य आहे. भंडार यासाठी शेकडो लोकांचे हात रात्रंदिवस आपापल्यापरीने राबत असतात राज्यातील हजारो गावांना एकोप्याचा संदेश देत वर्डी गावाने या सोहळ्यातून एक वेगळी परंपरा जपली. 
     दीडशे क्विंटल गव्हाची बट्टी ही गौऱ्यावर शेकून तयार केलेली असते, महाप्रसादासाठी बट्टी वरण व वांग्याची भाजी महाप्रसाद म्हणून सर्व भाविकांना दिली जाते रात्रभर भजन, आदिवासी नृत्य, भारुड हे दोन दिवस होळी व धुलीवंदन रात्र व दिवस चालू असतात बाबांच्या कृपेने गावावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती चा परिणाम होत नाही त्यामुळे बाबांची कृपा नेहमीच भाविक वर्गावर असते. 
   कर भला सौ हो हो भला ,गुप्त से मुक्त ,प्रकट सो पसारा. ही बाबांची शिकवण व संदेश 
    महाप्रसादासाठी लागणारी केळीची पाने ही मनवेल येथील दादाजी दरबार यांच्याकडून पुरवली जातात, तसेच भाजी साठी लागणारी वांगे अडावद व आजूबाजूची गावातील शेतकऱ्यांकडून पुरवली जातात. 
   यावर्षी भंडाऱ्या साठी जिल्ह्याचे कलेक्टर श्री अभिजीत राऊत साहेब यांना स्वतः मठाधिपती श्री दिवाकर नाथ महाराज यांनी स्वतः जाऊन आमंत्रण दिलेले आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील माजी विधानसभा अध्यक्ष श्री अरुण भाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती राकेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य घनश्याम निंबाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सभापती विनायक चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती कांतीलाल पाटील या सर्वांची उपस्थिती राहणार आहे.
    भंडाऱ्याचे नियोजनासाठी पोलीस पाटील श्री पद्माकर नाथ यांचे नियोजन तसेच अडावद पोलीस स्टेशनचे पीआय किरण दाडगे साहेब व त्यांची टीम यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे. तसेच गावातील सरपंच सौ ललिता दत्तात्रय पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण मंडळी, व्यापारी बांधव ,डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन, भजनी मंडळ, या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी भंडारा साठी आवर्जून उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मठाधिपती श्री दिनानाथ महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे.
                  ॥ कार्यक्रमाची रूषरेषा ॥
                सकाळी सात वाजता -आरती.
          सकाळी आठ वाजता - मारूती अभिषेक.
           सकाळी नऊ वाजता - समाधी अभिषेक.
      सकाळी दहा वाजता - समाधी पंचामृत स्नान.
             सकाळी अकरा वाजता - होम हवन.
               दुपारी बारा वाजता - मोठी आरती.
                दुपारी एक ते रात्री बारा पर्यत -                                       महाप्रसाद(भोजन)
              सांयकाळी सात वाजता -  संध्यारती.
             रात्री आठ वाजता - पालखी मिरवणुक.
      रात्री नऊ वाजता - भजन, किर्तन, भारूडांचा कार्यक्रम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज