रस्त्यात खड्डे कि खड्डयांमध्ये रस्ता हे कळे नाही राव ... चोपडा न. पा. ला अजून हे कसे नाही ठाव ... - The Chopda News

 The Chopda News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

test banner

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

मार्च १२, २०२२

रस्त्यात खड्डे कि खड्डयांमध्ये रस्ता हे कळे नाही राव ... चोपडा न. पा. ला अजून हे कसे नाही ठाव ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
         रस्त्यात खड्डे कि खड्डयांमध्ये रस्ता हे कळे नाही राव ... चोपडा न. पा. ला अजून हे कसे नाही ठाव ...
    चोपडा शहरातील मुख्य रस्ता, बाजारपेठ,प स समोरील रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरातील सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. तसेच जुन्या स्वस्तिक टॉकीज पासून ते थाळनेर दरवाजा चौक रस्त्याची अवस्था एकदम खराब झालेली असून गेल्या सहा वर्षापासून त्याचे काम रखडले आहे. तसेच थाळनेर दरवाजा ते राणी लक्ष्मीबाई चौक या रस्त्याने जवळजवळ चार वर्षापासून कात टाकलेली आहे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा नगरसेवक, नगराध्यक्ष, सिओ साहेब नगरपालिका चोपडा यांनी जातीने दुर्लक्ष केलेअसेच म्हणावे लागेल.चोपडा शहर, चोपडा नगरपालिकेला कोणीच वाली नाही असंच नागरिकांच्या लक्षात येत आहे.
    भामरे हॉस्पिटल आणि हरताळकर हॉस्पिटल यांच्या समोरच्या रस्त्यावरच मोठ मोठाले खड्डे आहे डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या दवाखान्याचा समोर चौकांमध्ये सुध्दा रस्ता खूप खराब आहे तसेच यासारखीच किंबहुना यापेक्षा ही जास्त दुर्दशा शहरात इतर रस्त्यांची झाली आहे.तक्रार देऊन सुद्धा कोणीच याची दखल घेत नाहीये.
     कमीत कमी नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे यांची डागडुगी करण करावे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासा पासून वाचवावे ही नम्र विनंती व मागणी डॉ. रोहन महिंद्र पाटील (युवा सेना शहर प्रमुख) यांनी व शहरातील नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज