पंकज प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा.... - The Chopda News

 The Chopda News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

test banner

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

मार्च ०८, २०२२

पंकज प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा....

चोपडा प्रतिनिधी :---
       पंकज प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा....
   येथील पंकज प्राथमिक विद्यालयात ८ मार्च जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले , राष्ट्रमाता मा जिजाऊ , अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील व शिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे , जयश्री पाटील , धनश्री जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
     महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना श्रीमती गायत्री शिंदे आपल्या मनोगतात म्हणाल्या , सन १९९०  च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो . तर भारतात मुंबई येथे पहिल्या महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिवस म्हणजे महिलांच्या सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव. महिला आज प्रत्येक क्षेत्रात अग्रणी आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत आहेत. महिलांनी अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
     सदर कार्यक्रम प्रसंगी चंद्रकांत जाधव, अनिल पाटील, चंद्रशेखर  चौधरी , दिलीप  जयस्वाल, आर डी पाटील , गायत्री शिंदे , जयश्री पाटील , धनश्री जावळे ,मनोज अहिरे, प्रशांत पाटील, योगेश चौधरी , महेश गुजर, गोपाल पाटील, प्रफुल्ल महाजन, स्वप्नील ठाकुर, मयुर पाटील, चंद्रकांत बाविस्कर आदी उपस्थित होते.
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप बाविस्कर, प्रमोद पाटील ,संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज