दुबई येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी श्री अनिलराज पाटील यांचे चित्र अखेरच्या फेरीसाठी पात्र ... - The Chopda News

 The Chopda News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

test banner

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

मार्च ०२, २०२२

दुबई येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी श्री अनिलराज पाटील यांचे चित्र अखेरच्या फेरीसाठी पात्र ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
   दुबई येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी श्री अनिलराज पुनमचंद पाटील यांचे चित्र अखेरच्या फेरीसाठी पात्र ...
   चोपडा  सुप्रसिद्ध कलाकार श्री अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या चित्राची  INTERNATIONAL PAINTING COMPETITION -"Sankatmochan" (आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन संकट मोचन) दुबई येथील ऑनलाइन प्रदर्शनसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत जगभरातील नामवंत कलाकारांच्या चित्राची निवड झालेली आहे.
  विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात सलग चौथ्यांदा त्यांच्या विविध कलाविष्काराची निवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी झाली. त्यात हार्मनी इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन , ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर स्मृति चित्रप्रदर्शन, रेनबो आर्ट वर्ल्ड दिल्ली द्वारा आयोजित मेटॅफर या जगविख्यात संस्थांच्या प्रदर्शनात निवड झालेली आहे. 
  वरील स्पर्धेत त्यांनी पूर्णाकृती श्री महाबली हनुमान या बलबुद्धी देवताचे हुबेहूब चित्र स्टीपलींग आर्टस् शैलीत निर्माण केले आहे. प्रभू श्री रामचंद्रांना अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन त्यांची सेवा करणारे पवनपुत्र
श्री हनुमंताच्या चित्रासाठी खालील चौपाई वर आधारित
चित्र साकारले आहे.
  भीम रूप धरि असुर संहारे । रामचंद्र के काज संवारे ।।
लाय सजीवन लखन जियाये l श्रीरघुबीर हरषि उर लाये ।।
  अनिलराज पाटील यांना त्यांचे गुरू ख्यातनाम चित्रकार चंद्रशेखर कुमावत  (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
  या धवल यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून व राज्य कला अकादमीचे कलाकारांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज